पंढरपूर (सोलापूर) -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहंकार चांगला नव्हे, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दोन वेळेस हरल्या होत्या. आमचे सरकार होते पण ते आले नाही. अजित पवार यांनी सत्तेच्या धुंदीत करू नये. आम्ही पण पाटील आहोत, त्यांची भाषा योग्य नसल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे, यावेळी ते बोलत होते. त्यातच राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणत खिल्ली उडवली होती. त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'अजित पवार यांच्यावर एम. फिल. करावी म्हणतो'
अजित पवार हे सत्तेत असल्यामुळे जोरात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएच. डी. करणार असे मी म्हटले होते. मात्र, आता अजित दादा यांच्यावर एम. फिल. करणार करणार आहे. सत्तेत असताना माणसाने विनम्र असावे. मात्र अजित पवार हे नाकवर करून चालत आहे. पण अजित पवारांनी सिंचन घोटाळा, बँक घोटाळा, राज्यातील अडचणीतील साखर कारखाने खरेदी केले आहेत. दादांनी एकदा राज्यात किती साखर कारखाने खरेदी केले आहे. त्याचे उत्तर द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.