सोलापूर - लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी निवडणूक लढणार आहेत. जय सिद्धेश्वर हे लिंगायत समाजाच्या मठाचे मठाधीश आहेत. सोलापूर हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघ आहे. सिद्धेश्वर यांच्याकडे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र असल्याने ते येथून निवडणुकीस पात्र ठरले आहेत.
सोलापुरात जय सिध्देश्वर भाजपचे उमेदवार; लिंगायत मतांसाठी उमेदवारी दिल्याची चर्चा - lingayat
सोलापूर मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामींचा मोठा भक्त परिवार आहेत. मतदारसंघात लिंगायत समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजपने जय सिद्धेश्वर यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर मतदारसंघात जय सिद्धेश्वर स्वामींचा मोठा भक्त परिवार आहेत. मतदारसंघात लिंगायत समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. लिंगायत मतांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजपने जय सिद्धेश्वर यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे. सिद्धेश्वर यांच्या उमेदवारीमुळे सुशिलकुमार शिंदेंना आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाही केली आहे. पण, माढ्याचा उमेदवार कोण असेल याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसापूर्वी रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे येथील उमेदवारी रणजीतसिंह यांनाच मिळते की भाजप दुसरा पर्याय शोधतो हे पाहणे महत्वाचे आहे.