महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 28, 2020, 9:43 PM IST

ETV Bharat / state

करमाळ्यात युरिया खतासाठी कृषी विभागासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन

कृषी खात्यास पाठीशी घालून आघाडी सरकार युरिया खताची कृत्रिम टंचाई करीत आहे. करमाळा तालुक्यात डुप्लीकेट खतविक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. असे म्हणत, शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून करमाळा कृषी कार्यालयासमोर घंटानाद करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 भाजपचे घंटानाद आंदोलन
भाजपचे घंटानाद आंदोलन

सोलापूर : कृषी खात्यास पाठीशी घालून आघाडी सरकार युरिया खताची कृत्रिम टंचाई करीत आहे. करमाळा तालुक्यात डुप्लीकेट खतविक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. असे म्हणत, शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून करमाळा कृषी कार्यालयासमोर घंटानाद करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजप करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

राज्यात सध्या खरीप हंगाम सुरू आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा तुटवडा होत आहे. याचा फटका करमाळा तालुक्यालाही बसला आहे. शेतकर्‍यांना सध्या युरिया व इतर रासायनिक खतांची गरज आहे, असे म्हणत गणेश चिवटे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तर, १ ऑगस्टपर्यंत युरिया मिळाला पाहिजे आणि डुप्लीकेट खतांची विक्री करणार्‍यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही केली. अन्यथा पुढील काळात कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी सर्व दुकानदारांना सूचना दिल्या आहेत असे सांगितले. लवकरात लवकर युरिया उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठांकडून भ्रमणध्वनीद्वारे विचारणा करून एक तारखेपर्यंत युरिया देण्याचे आश्वासन दिले. तसेच खते असोसिएशनचे अध्यक्ष महेश चिवटे यांनीही आम्ही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. सदर आंदोलनास यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकण, जिल्हा सरचिटणीस सुहास घोलप, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवामोर्चा अध्यक्ष सचिन गायकवाड, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, ओबीसी अध्यक्ष धर्मराज नाळे, विस्तारक अ‌ॅड भगवान गिरी गोसावी, किसानमोर्चा अध्यक्ष विजय नागवडे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष निलेश भुसारे, संतोष वाळुंजकर, मोहन शिंदे, मच्छिंद्र हाके, डॉ. अभिजीत मुरुमकर, आजिनाथ सुरवसे, दादा देवकर, लक्ष्मण काळे, भारत चौधरी, संदीप काळे, भैया कुंभार, हनुमंत बरडे, ऋषिकेश गोसावी, अमोल पवार, संतोष कांबळे, सुरज शेख, हनुमंत शिंदे, गणेश जाधव आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details