सोलापूर- राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना समज दिली. त्यानंतर राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी राज्यभरातील भाजप समर्थकांनी आंदोलने केली. त्याचप्रमाणे शनिवारी सोलापुरातल्या भाजप कार्यकर्त्यांनीदेखील राहुल गांधींचा निषेध केलाय.
चौकीदार चोर है.. प्रकरणावरून सोलापुरात भाजपकडून राहुल गांधींचा निषेध
राज्यातील सत्ताकारणात भाजप पिछाडीवर गेल्यानंतर भाजपचे हे पाहिलं आंदोलन होते. त्यामुळं एकप्रकारे भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनांच्यानिमित्ताने का होईना भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी बाकावर बसायची तयारी ठेवलीय, हे स्पष्ट झालंय.
राफेल खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत,राहुल गांधींना माफी मागायला लावली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्यावतीने राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याबद्दल संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेटवर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, सरचिटणीस बिजू प्रधाने चंद्रकांत रमणशेट्टी माजी आमदार नरसिंग मेंगजी माजीसह आदी भाजपाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.
राज्यातील सत्ताकारणात भाजप पिछाडीवर गेल्यानंतर भाजपचे हे पाहिलं आंदोलन होते. त्यामुळं एकप्रकारे भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनांच्यानिमित्ताने का होईना भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी बाकावर बसायची तयारी ठेवलीय हे स्पष्ट झालंय.