महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्री विठ्ठल-रुक्मिणी देवता परिवारातील मंदिराचे अन् सभा मंडपाचे जीर्णोद्धार होणार - पंढरपूर मंदिर बातमी

श्री विठ्ठल-रुक्मिणी परिवार देवताच्या 5 मंदिरासह सभा मंडपाच्या सुशोभीकरण व नूतनीकरणाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

भूमिपूजन छायाचित्र
भूमिपूजन छायाचित्र

By

Published : Feb 27, 2021, 12:25 AM IST

Updated : Feb 27, 2021, 5:48 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या परिवार देवताच्या 5 मंदिरासह विठ्ठलाच्या सभा मंडपाच्या सुशोभीकरण व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या सुशोभीकरण कामासाठी 1 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. भाविकांच्या देणगीमधून काम केले जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सहअध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

माहिती देताना ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर

पुरातन विभागाच्या देखरेखीत होणार काम

रुक्मिणी मंदिर समितीने 2015 चा पंढरपूर शहर व आसपास गावाचे 28 परिवार देवता ताब्यात घेतले. त्या सर्वांची सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याबाबत पुरातन विभागाला कळविण्यात आले आहे. त्यातील काही परिवार देवता मधील मंदिराचे संवर्धन गरजेचे झाले होते. पुरातन विभागाला याबाबत माहिती देऊन विठ्ठल मंदिर परिवारातील पाच मंदिरांचे व सभागृहाचे जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्यासाठी पुरातन विभागाची परवानगी घेण्यात आली आहे.

परिवार देवतांच्या जीर्णोद्धारासाठी 1 कोटी 28 लाख खर्च

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या परिवार देवता मधील पाच मंदिरे व सभागृहाचे नूतनीकरण यासाठी तब्बल एक कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, मंदिर समितीकडून याबाबत एक रुपयाही खर्च केला जाणार नाही. तो सर्व खर्च भाविकांच्या देणगीतून होणार आहे. यासाठी सात देणगीदारांनी तयार झाले आहे.

सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा

विठ्ठलाच्या परिवार देवतांमधील पंढरपूर शहर व आसपासच्या परिसरातील रिद्धी-सिद्धी मंदिर, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, रोकडोबा मारुती मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिराच्या नूतनीकारण व सभा मंडपाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा झाला. त्याचबरोबर कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा -सोलापूरमध्ये आप पक्षाचा आक्रमक पवित्रा; घरांचे तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडले

Last Updated : Feb 27, 2021, 5:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details