सोलापूर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव ( Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary ) मिरवणुकीत डॉल्बी लावण्यावरून सध्या ( Bhim Jayanti Dolby Dispute ) वाद निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी कायद्यावर बोट ठेवत डॉल्बीला बंदी केली आहे. हा वाद सद्या चिघळला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या पार्क चौक येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आंबेडकरी ( Rasta Roko Agitation By Bhimsaikin In Solapur ) अनुयायांनी अचानक रास्ता रोको केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार, अशी भूमिका यावेळी आंबेडकर नेत्यांनी, दलित बांधवांनी घेतली आहे. पण नियमावर बोट ठेवून प्रशासन जयंतीला आडकाठी करत आहे, असा आरोप करत अनेक भीम सैनिकांनी बुधवारी दुपारी पार्क चौक येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती.
डॉल्बीच्या मागणीसाठी रास्ता रोको -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 75 डेसीबील सारख आवाज येणारे डॉल्बी सोलापुरात कोणत्याही सार्वजनिक उत्सवात वाजवता येणार नाही, अशा सूचना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सांगितल्या. याला दलित बांधवानी तीव्र विरोध करत, दोन बेस दोन टॉप अशा डॉल्बीची मागणी केली. यावरून पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी नेते, दलित बांधवांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालाससमोर धरणे आंदोलन सुरू असताना, पार्क चौकात अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंद चंदनशिवे, रॉकी बंगाळे, बाळासाहेब वाघमारे, अजित गायकवाड सह आदी भीम सैनिकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.