महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत चांगला निर्णय - पेरे पाटील

निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ठेवली आहे. हा चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी दिली.

बोलताना
बोलताना

By

Published : Jan 24, 2021, 10:07 PM IST

Updated : Jan 24, 2021, 10:33 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ठेवली आहे. हा निर्णय चांगला असून यामुळे 50 टक्के तरी आळा बसला. मात्र, 50 टक्के घोडेबाजार होणार आहे. जनतेतून सरपंचपदाची निवडणूक चांगली होती. पण, सदस्य निवडणे ही अधिक चांगली आहे, असे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी म्हणाले.

बोलताना पेरे पाटील

उद्योजक अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्यांसाठी 'आदर्श ग्रामपंचायतच्या मार्गावरून ध्यास समृद्ध गावाचा' या कार्यशाळेत पेरे पाटील बोलत होते.

नवीन सदस्यांनी वृक्षलागवड करण्याचे आव्हान

भास्करराव पेरे पाटील म्हणाले, 80 सालापासून पांडुरंगाची वारी करत आहे. संतांच्या शिकवणीमुळे आदर्श काम करू शकलो. नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने 15 ऑगस्टला वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नागरिकांनी प्रत्येक कार्यक्रमात वृक्षारोपण करून आपले कर्तव्य पार पडले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारला एक संकल्पना देणार असल्याचे पेरे पाटील यांनी सांगितला. पंढरपूरच्या विकासातून राज्याला एक संदेश गेला पाहिजे, अशा प्रकारचे काम असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -पुत्रदा एकादशी निमित्ताने भाविकांनी पंढरी फुलली; कोरोना नियमांचा मात्र विसर

Last Updated : Jan 24, 2021, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details