महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंद : पंढरपुरात विविध पक्षांतर्फे केंद्र सरकारचा निषेध

शिवाजी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधायक विरोधात आंदोलन करण्यात आले.

pandharpur
pandharpur

By

Published : Dec 8, 2020, 1:03 PM IST

पंढरपूर -कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या समर्थनार्थ शिवाजी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधायक विरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील तुंगतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

pandharpur

दुकाने बंद

पंढरपुरातील व्यापारी महासंघाने व्यवहार बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला. स्टेशन रोड, विठ्ठल मंदिर परिसर येथील व्यापारी 100% व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. शहरातील नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस या तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवली.

सोलापूर जिल्ह्यात सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या बंदला शांततेत प्रतिसाद मिळताना दिसला. पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details