महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद ! 17 वर्षात एकही सुट्टी न घेता शाळेसाठी परिश्रम घेणारे 'भडकवाड गुरुजी' - एकही सुट्टी न घेणारे 'भडकवाड गुरुजी'

शिक्षकांच्या सुट्टीचा विषय हा नेहमी चर्चीला जातो. बार्शी तालुक्यातील सुर्डीचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी सतरा वर्षापासून एकही सुट्टी घेतली नाही. सुर्डी येथील शेळके वस्ती शाळेतील चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे गिरवण्याचे काम सत्यवान भडकवाड यांनी केले आहे. सोबतच या वस्तीतील शाळेचा कायापलट करण्याचे कामही या शिक्षकाने केला आहे.

भडकवाड गुरुजी
भडकवाड गुरुजी

By

Published : Sep 23, 2021, 7:30 PM IST

Updated : Sep 23, 2021, 8:24 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -शिक्षक हे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता विद्यार्थ्यांना हस्तांतरित करतात, आचार करतात शैक्षणिक प्रक्रियांपासून ते व्यक्तिमत्त्वाच्या निर्मिती आणि परिवर्तनावर काम करत असतात. शिक्षकांच्या सुट्टीचा विषय हा नेहमी चर्चीला जातो. बार्शी तालुक्यातील सुर्डीचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी सतरा वर्षापासून एकही सुट्टी घेतली नाही. सुर्डी येथील शेळकेवस्ती शाळेतील चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे गिरवण्याचे काम सत्यवान भडकवाड यांनी केले आहे. सोबतच या वस्तीतील शाळेचा कायापलट करण्याचे कामही या शिक्षकाने केला आहे.

सतरा वर्षांपासून अविरत ज्ञान देणारा शिक्षक

2003 साली जिल्हा परिषद परिषदेच्या योजनेतून निवासी झोपडी शाळा सुरू केली. यामुळे वस्तीवरील गोरगरीब व तळागाळातील लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य निवासी शाळेने केले. यामुळे वस्तीतील चिमुकल्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण झाली. याची सुरुवात शेळकेवस्ती शाळेपासून शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी सतरा वर्षांपूर्वी केली होती. सतरा वर्षाच्या कालखंडामध्ये अविरतपणे ज्ञान देण्याचे काम त्यांनी केले आहे.

अशी भरते सुट्टीतील शाळा

शिक्षकांच्या सुट्टी विषयी नागरिकामध्ये नेहमीच चर्चा होत असते. मात्र यातूनही शिक्षक सत्यवान भडकवाड यांनी आपल्या शिक्षकी पेशाला सुट्टीचा कोणताही गंध लागू दिला नाही. चिमुकल्यांना सोबत घेऊन सुट्टीच्या दिवशी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर भर दिला. त्यांच्या आवडीच्या विषयांचे सादरीकरण केले. शनिवार, रविवार व इतर दिवशी सुट्टीतील शाळा भरण्याचे काम त्यांनी केले. सुट्टीच्या दिवशी शाळेतील चिमुकल्यांना घेऊन शाळेची स्वच्छता आणि शोभा वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे लहान वयातच स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. सुट्टीच्या दिवशी दोन ते तीन तास शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये घालवण्याचा आनंद सत्यवान भडकवाड घेत असतात.

लोकसहभागातून शाळेचा कायापलट

जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शेळकेवस्ती शाळेत राबवण्यात आला. त्यासंदर्भात लोकसहभागातून शाळेच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सहयोगी शिक्षकांच्या वर्गणीतून शाळेची रंगोटी करण्यात आली. शिवाय या कामाला गावातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शाळेच्या इमारती अधिकच सुंदर दिसू लागल्या. मुलांकडे टॅब आणि इ- लर्निंगच्या सुविधा देखील उपलब्ध झाले. कोरोना काळात चिमुकल्यांचा वस्ती शाळेबरोबर असलेला संपर्क तुटू नये, म्हणून विविध उपक्रमही राबवण्यात आले.

हेही वाचा -VIDEO : नृत्य, अदा आणि सौंदर्याने रसिकांना भुरळ घालणारा 'लावणी सम्राट', पाहा विशेष रिपोर्ट

Last Updated : Sep 23, 2021, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details