पंढरपूर- राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांची विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संचालकांच्या अनुमतीने एकमताने ही निवड करण्यात आली. आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. दुय्यम निबंधक एस एम तांदळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. भारत नाना भालके हे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही काम पाहत होते. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन पदही रिक्त झाले होते. सोमवारी झालेल्या विठ्ठल कारखान्याच्या संचालक बैठकीमध्ये आमदार भालके यांचे पूत्र भगीरथ भालके यांची सर्व अनुमतानी निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक मंडळांनी त्यांचे अभिनंदन केले.