महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दंड काय थोपटता 2024 साली विधानसभेच्या रिंगणात बघू - भगीरथ भालके - पंढरपूर लेटेस्ट न्यूज

आमदार भारत नाना भालके यांच्याप्रमाणे दंड थोपटून आवताडे विजय झाल्यानंतर अशी बाब करणे चुकीचे आहे. हयात नसणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी कृती करणे योग्य नाही, येणाऱ्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आमने सामने दंड थोपटून त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनता याचे साक्षीदार असेल, असा इशारा भगीरथ भालके यांनी दिला आहे.

भगीरथ भालके
भगीरथ भालके

By

Published : May 3, 2021, 7:57 PM IST

Updated : May 3, 2021, 8:13 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आमदार प्रशांत परिचारक यांनी दंड थोपटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके सांगितले की, हयात नसलेल्या व्यक्तीची कृती करणे योग्य नाही, जर दंड थोपटायचे असतील तर येणाऱ्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांच्याविरुद्ध थोपटा, असे आवाहन भगीरथ भालके यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना दिले आहे.

तेव्हा भारत नाना भालकेनी दंड थोपटले होते
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करून विजय झाले होते. त्यानंतर आमदार भारत नाना भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांना अभिवादन करून दंड थोपटले होते. त्यानंतर दिवंगत आमदार भारत नाना भालके पैलवान असल्यामुळे त्यांनी दंड थोपटून आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या त्या कृतीची राज्यभरात चर्चाही झाली होती. दंड थोपटण्याची कृती परिचारक गटांच्या कार्यकर्त्यांना चांगली जोमली होती. भारत नाना भालके यांनी विजयाची निशाणी म्हणून दंड थोपटले होते.

भगीरथ भालके
..म्हणून आमदार परिचारकांनी दंड थोपटले

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवल्यानंतर पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार प्रशांत परिचारक यांनी दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्याप्रमाणे दंड थोपटून दाखवले. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात विजयी उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी गुलाल व जंगी मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम पार पडला.

भगीरथ भालके यांचा परिचारकांना इशारा
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतदान कमी झाले आहे. मात्र नेते व कार्यकर्त्यांनी योग्य साथ दिल्याबद्दल भगीरथ भालके यांनी त्यांचे आभार मानले आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या त्या कृतीला उत्तर देताना भगीरथ भालके म्हणाले की, आमदार भारत नाना भालके यांच्याप्रमाणे दंड थोपटून आवताडे विजय झाल्यानंतर अशी बाब करणे चुकीचे आहे. हयात नसणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी कृती करणे योग्य नाही, येणाऱ्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत आमने सामने दंड थोपटून त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनता याचे साक्षीदार असेल, असा इशारा भगीरथ भालके यांनी दिला आहे.

हेही वाचा -नाना पटोलेंना कोणीच गांभीर्याने घेत नाही, त्यांचे आयुष्य कोलांडी करण्यात गेले - आशिष शेलार

Last Updated : May 3, 2021, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details