महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांचे अर्ज दाखल - samadhan aavatade filed nomination

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पंढरपूर येथे प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

Bhagirath Bhalke and samadhan aavatade
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठीचे भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार

By

Published : Mar 30, 2021, 3:25 PM IST

Updated : Mar 30, 2021, 3:38 PM IST

पंढरपूर -पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पंढरपूर येथे प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथील श्रेयस पॅलेसमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संत तनपुरे महाराज मठ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे

हेही वाचा -तलवारी, भाले, इतर शस्त्रे घेऊन शीखांचा पोलिसांवर हल्ला, नांदेड पोलीस अधीक्षकासह ४ जखमी

मतदारसंघाच्या विकासासाठी उमेदवारी

महाविकास आघाडीच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी विकासनिधी थांबला आहे. या विकासासाठी भाजपचे उमेदवार असणार आहेत, असे प्रतिपादन समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना केले. महाविकास आघाडीतील अनेक स्थानिक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. गेल्या निवडणुकीची ताकद एकत्र आल्यामुळे मोठ्या मतांनी भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास आवताडे यांनी व्यक्त केला. भाजपच्या घटक पक्षांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याबद्दल विचारले असता, ते घरातील भांडणे आहेत. ते जास्त काळ चालत नसतात असे सांगून आवताडे यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री राम शिंदे, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजय कुमार देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीत पक्षांची नाराजी दूर करणार

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे घटक पक्षातील ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्या उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या माध्यमातून जी कामे अपूर्ण राहिली आहेत, ती पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही भगीरथ भालके यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संबोधित केले.

हेही वाचा -छातीत दुखत असल्याची सचिन वाझेची तक्रार, मधुमेहाचा आहे त्रास, 'जेजे'त केले दाखल

Last Updated : Mar 30, 2021, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details