महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काव्या मला माफ कर... इंजिनिअर तरुणाची सोलापुरात आत्महत्या - engineer suicide solapur

बंगळुरू येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या सॉफ्टवेअर इंजनिअरचा गळफास घेतलेल्या अवस्थेतेतील मृतदेह सापडला होता. सोलापूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कूमठे गावातील शिवारात उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता.

मृत मधू बाबू साने

By

Published : Oct 12, 2019, 11:39 PM IST

Updated : Oct 12, 2019, 11:49 PM IST

सोलापूर - 'काव्या मला माफ कर' असे म्हणत नोकरी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोलापुरात आत्महत्या केली आहे. मधू बाबू साने असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. सोलापूर शहराजवळ असलेल्या कुमठे गावाच्या शिवारातील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता.

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने सोलापुरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मधू बाबू साने हा बंगळुरू येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. मागील 30 तारखेला तो गुटूंर येथे सासरवाडीला गेला होता. सासूरवाडीतून तो गायब झाल्याची तक्रार गुटूंर शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती. मधू बाबू साने हा हरवला असल्याची तक्रार गुंटूर पोलिसात दाखल झालेली असताना त्याचा मृतदेह एका उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. हा मृतदेह 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाडाला लटकलेल्या अवस्थेतच होता.

हेही वाचा - सोलापूर : कुमठे गावात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह

ज्या ठिकाणी मृतदेह सापडला आहे, ती जागा वनखात्याची आहे. वनखात्याची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी जात नाही. आज सकाळी पोलीस मुख्यालयाला फोन करून कळविण्यात आल्यानंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळाला. या मृतदेहा जवळ असलेल्या बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रावरून आणि आधारकार्डवरून हा मृतदेह मधू बाबू साने यांचा असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली होती. मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा नंबर लावून त्यांना कळवण्यात आले. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता असल्याने तो सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शिवसेनेला पाठिंबा; शेकापचा बालेकिल्ला धोक्यात

Last Updated : Oct 12, 2019, 11:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details