महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधासभा पोटनिवडणुकीसाठी मतदानयंत्रे सीलबंद - पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक

विधासभा पोटनिवडणुकीसाठी मतदानयंत्रे सीलबंद करण्यात आली आहेत. याबाबत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पंढरपूर
पंढरपूर

By

Published : Apr 15, 2021, 5:51 PM IST

पंढरपूर - विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक 17 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. निवडणूकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदारसंघातील मतदान यंत्रे सील बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

पोटनिवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रे-

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रे असून त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहायक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1 048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशीन असणार आहेत. 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट तसेच 260 व्हीहीपॅट मशीन राखीव ठेवण्यात येणार आहेत. 53 मतदान यंत्रे मतदार जागृतीसाठी व प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार असून या मतदान यंत्राचा अन्यत्र कोठेही वापर केला जाणार नाही. मतदान यंत्रे बॅलेट पेपर लावल्या नंतर सीलबंद करण्यात येत असून, या प्रक्रीयेवेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदावर यांना आमंत्रित करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी सांगितले.

स्ट्रॉग रुम व मतदान साहित्य देण्यासाठीही पथकांची नियुक्ती -

पंढरपूर येथे 30 टेबलवरून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सील करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले. यासाठी प्रत्येक टेबलवर मंडलाधिकारी अथवा झोन ऑफिसर दोन तलाठी तसेच कोतवाल यांचे पथक नेमण्यात आले आहे. स्ट्रॉग रूम व मतदान साहित्य देण्यासाठीही पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर 5 टेबलवर 26 मतदान यंत्रावर एक हजार मतांचे प्रात्यक्षिक करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details