बार्शी - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. भविष्यातील कोरोनाच्या लाटेचा धोका ओळखून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील सर्व बालरोग तज्ज्ञ यांची शनिवारी बैठक घेतली.
तयारी तिसऱ्या लाटेची ; बार्शीत उभे राहणार 500 बेडचे बाल कोविड सेंटर - बार्शी कोरोना न्यूज
कोरोनाची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता तिसऱ्या लाटेबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. यामध्ये लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच पूर्वतयारी म्हणून म्हणून आ. राजेंद्र राऊत यांनी शहरातील बालरोगतज्ज्ञ यांची बैठक घेऊन बाल कोविड सेंटर उभारणीबाबत सूचना केल्या आहेत.
0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी कोविड रुग्णालय
बार्शी शहर व तालुक्यासाठी लवकरच बार्शी शहरात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, की देशाची भविष्य असलेली बालके व तरुण पिढीच्या संरक्षणासाठी, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, बालरोग तज्ज्ञ व इतर यंत्रणेसोबत एकमेकांच्या सहकार्याने सज्ज झाले आहेत. या लाटेचा सामना करण्यासाठीच ही आढावा बैठक घेऊन लाटेची पूर्व तयारी चालवली आहे.