सोलापूर - लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी राजकीय पक्ष अनेकदा धार्मिक मिथकांचा वापर करतात. धार्मिक मिथके , देवी देवता यांना लोकांच्या मनात विशेष स्थान असल्याने त्याकडे ते आकर्षित होतात. याचेच उदाहरण काँग्रेसच्या सोलापुरातील प्रचार सभेत दिसून आले. बहुरुपी समाजातील कलाकार काँग्रेसच्या रॅलीत राम, सीता आणि हनुमानाचा वेष धारण करुन सामिल झाले होते. या राम सीतेने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
काँग्रेसच्या प्रचार रॅलीत अवतरला राम...सोलापुरात बहुरुपींनी साकारली राम-सीतेची वेशभूषा - हनुमान
सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. गेल्यावेळी त्यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. यावेळी त्यांच्यासमोर भाजप उमेदवार जय सिद्धेश्वर आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान आहे.
बहुरुपी समाज हा आजही मोठ्या प्रामाणात अशिक्षीत आहे. शिक्षणाचा प्रसार न झाल्याने तो पारंपरीक व्यवसायावर अवलंबून आहे. वेगवेगळे वेष धारण करणे हा या कलाकारांचा व्यवसाय आहे. काँग्रेसने आपल्या रॅलीत या कलाकारांना बोलावले. या कलाकारांनी राम, सीता, हनुमान यांची वेशभूषा करुन लोकांचे आकर्षण मिळवले.