महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी मैदानात - सोलापूर

भाजपला मदत व्हावी अशीच भूमिका घेतली जात असल्याने बसपा या निवडणुकीत आंबेडकर यांना विरोध करत असल्याचे बसपा नेते संजीव सदाफुले यांनी म्हटले आहे. दलित नेत्यांचं ऐक्य भासविण्यासाठी भाजपच्याच नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप बसपा उमेदवार राहुल सरवदे यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी मैदानात

By

Published : Mar 26, 2019, 11:32 PM IST

सोलापूर -वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीला बहुजन समाज पक्षाने आव्हान दिले आहे. राहुल सरवदे यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळं दलित मतांवर डोळा ठेवून सुरु असलेल्या राजकारणाला नवं वळण मिळाले आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी मैदानात

आंबेडकरांनी काल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरत शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला मायावतींच्या बसपाच्यावतीने आक्षेप घेतला गेलाय. भाजपला मदत व्हावी अशीच भूमिका घेतली जात असल्याने बसपा या निवडणुकीत आंबेडकर यांना विरोध करत असल्याचे बसपा नेते संजीव सदाफुले यांनी म्हटले आहे.

दलित नेत्यांचं ऐक्य भासविण्यासाठी भाजपच्याच नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप बसपा उमेदवार राहुल सरवदे यांनी केला आहे. त्यामुळं आंबेडकर नावाचे भांडवल करत आता दलित नेतृत्वात सुरु झालेल्या चिखलफेकीमुळं सर्वसामान्य कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details