सोलापूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे गरजेचे आहे. मात्र, असे असतानाही येथील नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. म्हूणन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. खरात त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या 'दिव्य कासव' या कलाकृतीला मास्क घालून कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. पौराणिक कथाची चित्र असलेल्या या कासवाला मास्क घालून हे कासव शहरातील पार्क चौकात ठेवण्यात आले होते.
घराच्या बाहेर पडताना सर्वांनी मास्क बांधूनच बाहेर पडले पाहिजे. मात्र, असे होत नाही त्यामुळेच मी माझ्या दिव्य कासवाला मास्क बांधून रस्त्यावर ठेवून सर्वांना मास्क वापरावे, असे आवाहन चित्रकार सचिन खरात यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना केले.
मास्क वापरा; सोलापुरमध्ये 'दिव्य कासव' कलाकृतीद्वारे जनजागृती प्रशासकीय पातळीवर सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तरीही शहरातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील नागरिक शासनाने तसेच आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.
यानुसार अनेकांवर मागील पाच दिवसांपासून कारवाईदेखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात पुढाकार घेतला. खरात यांनी त्यांची प्रसिद्ध असलेली कलाकृती 'दिव्य कासव' याला मास्क बांधून शहरातील पार्क चौक येथील रस्त्यावर ठेवले होते.
हेही वाचा -अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणजे शंकरराव चव्हाण, मधुकर भावेंनी दिला आठवणींना उजाळा