करमाळा (सोलापूर) - करमाळा शहरातील जामा मशिदीतून दिवसातून पाच वेळा स्पीकरवरून आजानसह कोरोनाविषयक जनजागृती केली जात आहे. जामा मशिदीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांना आपल्या घरामध्ये नमाज पठण करण्याबरोबरच आताच्या परिस्थितीत आपण कशाप्रकारे जबाबदारी पार पाडली पाहिजे याविषयी आवाहन केले जात आहे.
देशात व राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जास्तीत जास्त वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन वेताळ पेठेतील जामा मशिदमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जामा मस्जिदमध्ये दिवसातून पाच वेळा आजनच्या वेळी शहरातील सर्व नागरिकांना स्पीकरवरून कोरोनाचा धोका पाहता घराबाहेर पडू नका, नमाज पठनासाठी मशिदीत येऊ नका, आपापल्या घरीच नमाज पठण करा, सतत हात धुत रहा, मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, असे संदेश देण्यात येत आहे.