महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माघी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास - पंढरपूर माघी यात्रा न्यूज

पंढरपूरमध्ये आज माघी(जया)एकादशी सोहळा साजरा होत आहे. मात्र, कोरोनामुळे शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांशिवाय हा सोहळा साजरा केला जात आहे.

Shri Vitthal Rukmini
श्री विठ्ठल रुक्मिणी

By

Published : Feb 23, 2021, 7:57 AM IST

सोलापूर(पंढरपूर) -माघी यात्रा व जया एकादशी सोहळ्यानिमित्त मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी विविध प्रकारच्या एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. मंदिर गाभाऱ्याशिवाय नामदेव पायरी, सभामंडप याठिकाणीही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सण उत्सव काळात दानशूर व्यक्तीकडून फुलांची आरास करण्यात येते. आज देखील माघी यात्रेनिमित्त सजावट करण्यात आली. केशरी व पिवळा झेंडू, शेवंती, ग्लँडीओ, ऑर्किड, ब्लूडीजे, सँगो अशा रंगीत फुलांची आरास केली आहे. यासाठी लागणारी फुले ही पुणे येथील सचिन चव्हाण, संदीप पाटोळे पाटील, युवराज सोनार यांच्यावतीने देण्यात आली आहेत. त्यासाठी पन्नास हजार रुपयांचा खर्च आला आहे. या फुलांची आकर्षक आरास विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराला अधिक प्रसन्न करत आहे.

पंढरीत संचारबंदी लागू -

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या माघी यात्रेत गर्दी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मंदिर समितीकडून विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन 22 ते 23 फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, यादरम्यान पांडुरंगाची नित्यपूजा पार पडणार आहे. 24 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजल्यापासून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी पंढरपुरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे

मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई -

माघी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. माघी यात्रेला भाविक नसले तरी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी, उत्तर द्वार, पश्चिम द्वार, मुख्यद्वार तसेच विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे कळस यांवर विद्युत रोषणाई केली आहे. यामुळे मंदिर परिसर आकर्षक वाटत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details