पंढरपूर (सोलापूर) -माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेतकऱ्यांनी शेतीमाल डोक्यावर घेऊन महावितरण शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला असता. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात झालेल्या मोर्च्यामध्ये शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह सतरा शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोडनिंब वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न -
सोलापूर जिल्ह्यामध्ये वीज वितरण कंपनीकडून सक्तीच्या वीज बिल वसुली चालू करण्यात आली आहे. थकित बिल असणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट कायम राहिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पिकाला पाणी देतात येत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोडनिंब येथील वीज वितरण कंपनीवर माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. या मोर्चातील शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता उद्धव जानव यांच्यासमोर कार्यालयापरिसरात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी उद्धव जानव यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सतरा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल -
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अधिकार्यांकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे उपकार्यकारी उभियंता जानव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केले आहे. शिवाजी कांबळे यांच्यासह संतोष मारूती गायकवाड (वय ३५), नागेश अर्जुन गायकवाड (वय ३६), दीपक सर्जेराव कदम (वय २४, रा. वरवडे, ता. माढा), पोपट एन. वसेकर (वय २७), सुभाष व्ही. तागतोडे (वय ३७), अमर हरिदास बचाटे (वय २७), संग्राम बचाटे (वय २५), संजय जगन्नाथ पाटील (वय ४२), मारूती शिंदे (वय ४५, रा. अरण, ता. माढा), नाना सोलनकर (वय ४२) दत्तात्रेय त्र्यंबक धायगुडे (वय २९, रा. सोलनकरवाडी, ता. माढा), संतोष नानासाहेब पाटील (वय ३१), आकाश वसंत लोकरे (वय २६, रा. उजनी टेंभुर्णी, ता. माढा), संजय भीमराव जाधव (वय ५६, रा. जाधववाडी, ता. माढा), रणजित रमेश महाडिक (वय ३२), मेष बाळासाहेब मते (रा. मोडनिंब, ता. माढा) अशी गुन्हा नोंद झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा -पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत कडक लॉकडाऊन जाहीर