पंढरपूर - महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर होते. त्यावेळेस त्यांनी हे विधान केले. पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी खंजीर खुपसला-
2019 साली शिवसेना सर्व मित्रपक्षांना घेऊन विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळेस निवडणूकीनंतर सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन शिवसेनेने सरकार स्थापन करायला पाहिजे होते. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचा विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी मध्ये सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसलाचा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.