सोलापूर- दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर पंढरी मध्ये आषाढी एकादशी सोहळा ( Ashadi Ekadashi ) मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. यावर्षी आषाढी एकादशी साठी प्रशासनांने जोरदार तयारी केली आहे. तब्बल 15 लाख भाविक दाखल होणारअसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. गरिबांचा देव म्हणून पांडुरंगाची ( Pandurang ) ओळख आहे. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ मृदुंगाच्या डोलात मुखी विठू माऊली चे नाव घेत वारीला पायी चालत येतात. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये वैष्णवांचा महासागर जमलेला आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचा संकट ( crisis of corona ) दूर झाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना बऱ्याच वर्षांनी विठ्ठलावरच प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट ( Gift of gold crown Vitthal Rukmini ) भेट दिला आहे.
अडीच किलो सोन्याचा वजनाच मुकुट अर्पण-श्री विठ्ठल रुक्मिणीला तब्बल अडीच किलो सोन्याचं वजनाचे एक कोटी रुपयांचे सोन्याचे मुखवट भेट म्हणून देण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार हे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सोन्याची मुकुट भेट दिलं आहे. विजयकुमार उत्तरवार हे उमरी येथील सोने चांदीचे व्यापारी आहेत.यापूर्वी अनेक भाविक भक्तांकडून विठ्ठलाला मोठ्या प्रमाणावर विविध आभूषने, अलंकार,दागिने देण्यात आले आहे. आता या विठ्ठलाच्या दागिन्यांमध्ये एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या मुखुटाची भर पडली आहे.
यात्रेसाठी सजली पंढरी -आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली आहे. आज ( 9 जुलै ) सर्व पालख्यांचं पंढरपुरात आगमन झालं आहे. रविवारी आषाढी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. आळंदी आणि देहूहून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. नामदेव पायरीसोबत ते आपल्या विठुरायाचं दर्शनही घेणार आहेत. तसेच, चंद्रभागेत एनडीआरएफचं पथक वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी शनिवारी ( 9 जुलै ) आगमन होणार आहे.