पंढरपूरमध्ये दर्शन रांगेत भाविकाचा मृत्यू पंढरपूर : सध्या पंढरपूरमध्ये आषाढी वारीची तयारी सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी होऊ लागली आहे. मंदिर समितीकडून भाविकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जात आहेत. दर्शन सुलभ होण्यासाठी मंदिर समितीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील दोन दिवसापासून विठ्ठलाचे दर्शन 24 तास खुले ठेवण्यात आल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.
विठुरायाचे दर्शन अवघ्या काही पावलांवर :भाविकांच्या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी सध्या सात ते आठ तास लागत आहेत. अशातच 21 जून रोजी आठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरमध्ये एक दुःखद घटना घडली. विठ्ठल दर्शनासाठी बसलेल्या एका वृद्ध भाविकाचा विठुरायाचे दर्शन अवघ्या काही पावलांवर असतानाच अंत झाला आहे. भगवान घनःश्याम भोसले वय 76 रा.विटा हे भाविक बुधवारी दुपारच्या सुमारास विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. भोसले हे पाच ते सहा तासांपासून दर्शनासाठी उभे होते.
भोसले यांचा मृत्यू :भोसले हे विठ्ठलाच्या दर्शनापासून अवघ्या काही पावलांवर असतानाच विणेकडी येथील दर्शन फुलावर कोसळले. ते कोसळल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका मागविण्यात आली. मात्र, मंदिर समितीने पुलावरून खाली उतरण्यासाठी कोणताही तात्काळ पर्याय तयार केलेला नाही. त्यामुळे या वृद्ध भाविकाला भाविकांच्या रांगेतून गर्दीच्या विरुद्ध दिशेने खांद्यावर उचलून कासार घाट इथपर्यंत उलटे न्यावे लागले. दरम्यान तातडींना उपचार न मिळाल्याने भगवान भोसले यांचा मृत्यू झाल्याची चर्चा पंढरपूरमध्ये सुरू होती. दर्शन रांगेत कोसळलेले भोसले यांना प्राथमिक उपचारांसाठी रुग्णवाहिका मधून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
हेही वाचा :
- दुर्गामूर्ती विसर्जनाच्या वेळी अचानक नदीला आला पूर, ७ भाविकांचा मृत्यू
- Tree Falling On Temple : मंदिरावरील पत्र्यावर कोसळले झाड; 7 भाविकांचा मृत्यू
- Crane Collapsed On Devotee : मंदिरात सुरू होता धार्मिक कार्यक्रम, अचानक क्रेन कोसळल्याने 4 भाविकांचा मृत्यू