महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ASHADHI WARI 2021: 'पांडुरंगा सर्व जणांना सुखी ठेव' मानाच्या वारकऱ्यांची विठुरायाकडे प्रार्थना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल मंदिर समितीतील गेल्या वीस वर्षापासून विण्याची सेवा देणारे केशव कोलते यांनी सहपत्नी महापूजा केली आहे. यावेळी पांडुरंगा सर्व जणांना सुखी ठेव, राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी विठ्ठलचरणी मानाचे वारकरी केशव कोलते यांनी साकडे घातले आहे.

ASHADHI WARI 2021
'पांडुरंगा सर्व जणांना सुखी ठेव'

By

Published : Jul 20, 2021, 10:36 AM IST

पंढरपूर - पांडुरंगा सर्व जणांना सुखी ठेव, राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी विठ्ठलचरणी मानाचे वारकरी केशव कोलते यांनी साकडे घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल मंदिर समितीतील गेल्या वीस वर्षापासून विण्याची सेवा देणारे केशव कोलते आणि इंदुमती कोलते यांनी सहपत्नी महापूजा केली आहे. मुख्यमंत्र्यासोबत पूजा केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना कोलते यांनी विठ्ठलाला साकडे घातले सांगितले.

'पांडुरंगा सर्व जणांना सुखी ठेव' मानाच्या वारकऱ्यांची विठुरायाकडे प्रार्थना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपुलकीने चौकशी -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळवल्यामुळे कोलते दाम्पत्याने आनंद व्यक्त केला. विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केशव कोलते व इंदुमती कोलते यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना एसटी महामंडळाकडून मोफत पासचे वाटप करण्यात आले. कोलते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साधे आहेत. त्यांनी आमची आपुलकीचे चौकशीही केली.

केशव कोलते यांच्याकडून वीस वर्षापासून विठुराया चरणी विण्याची सेवा -

विठुरायाच्या मंदिरात वीस वर्षापासून विण्याची सेवा देण्याचे काम केशव कोलते करतात. वर्धा शहरातील रहिवाशी असलेले कोलते कुटुंब हे 1972 पासून पांडुरंगाची वारी नित्याने करतात. मात्र गेल्या वीस वर्षापासून विठ्ठल मंदिरामध्ये विण्याची सेवा देत आहेत. विठुरायाच्या सेवा भावामुळे विण्याची सेवा देत असल्याचेही कोलते कुंटुब म्हणाले.

हेही वाचा - ASHADHI WARI 2021: 'बा विठ्ठला..कोरोना संकट दूर कर, वारकर्‍यांनी भरलेली पंढरी पाहू दे', मुख्यमंत्र्याचे विठ्ठलाचरणी साकडे

ABOUT THE AUTHOR

...view details