दरवर्षी सोहळ्याला अश्व पुरवण्याची जबाबदारी शितोळे सरकारची पंढरपूर :पूर्वीच्या काळी राजेशाही होती. आदिलशाही, निजामशाही होती. आषाढी एकादशी सोहळा सुरू झाला, त्यावेळी या सोहळ्याला कुठला तर राज आश्रय आवश्यक होता. त्यावेळेस ही सगळी जबाबदारी शितोळे सरकारने घेतलेली होती. पायी दिंडी सोहळ्यामध्ये चालताना वारकऱ्यांचे संरक्षण करणे, वारकऱ्यांची कुठलीही दरोडेखोरी, चोऱ्या माऱ्या होऊ नये. याची जबाबदारी त्याकाळी घेतली जात असल्याचे शितोळे सरकारच्या वंशजाने सांगितले आहे.
आश्वांच्या देखरेखीसाठी 35, 40 लोक :त्यांच्यासोबत त्याकाळी काही सैनिक सुद्धा यायचे, संरक्षण करायचे. अश्वसुद्धा त्याकाळी त्यासाठीच आणला जायचा. परंतु त्या आश्वासोबत सुद्धा दिंडी सोहळा आनंदाने साजरा होत असे. त्यानंतर हा मान पडला आणि यावर दरवर्षी आता शितोळे सरकार हे अश्व आणत असतात. त्यांच्यासोबत 35, 40 लोकांचा लवाजमा या सगळ्या आश्वांच्या देखरेखीसाठी असतो. माऊली ही पालखी ओढत असतात. आम्ही काहीच नाही, पण याची आम्हाला अभिमान आहे की आमच्या पूर्वजाच्या पुण्याईने आम्हाला भाग्य मिळते, अशी प्रतिक्रिया शितोळे सरकार यांनी दिलेली आहे.
अश्व माऊलींची पादुका चालतात :हे अश्व दरवर्षी दिंडी सोहळ्यात माऊलींची पादुका घेऊन चालत असतात. रिंगण सोहळे करत असतात .परंतु काळजी मात्र तेवढाच वर्षभर घेतली जाते. त्यासाठी वेळोवेळी त्यांना डॉक्टर आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी काही खास लोक सुद्धा या ठिकाणी आहेत. सेवा करण्याचे भाग्य आम्हाला असेच मिळत राहो, हीच प्रार्थना माऊलीकडे आणि विठ्ठलाकडे आहे. असे सुद्धा शितोळे सरकार म्हणाले, कालांतराने सगळ्या आधुनिक व्यवस्था आल्या पण त्याकाळी ही व्यवस्था किती महत्त्वाची होती, हे त्या काळच्या राजेशाही साम्राज्यशाही यावरून कळते. त्यामुळेच हा राजाश्रय आणि संरक्षण देण्यात आले होते.
हेही वाचा :
- Nanded Crime: विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला गेलेल्या फोटोग्राफरच्या घरात दरोडा, चड्डी गँगचा कारनामा सीसीटीव्हीत कैद
- Ashadhi Ekadashi 2023: अनोखी भक्ती, विठुरायाच्या भक्तांनी प्रसादासाठी तयार केले 72 हजार लाडू
- Ashadhi Wari 2023 : विठ्ठल एक्सप्रेस पंढरपूरकडे रवाना; रेल्वे विभागाकडून विठ्ठल भक्तांसाठी विशेष सुविधा