पंढरपूर - वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली आषाढी यात्रा पंढरपुराने पाहिली आहे. तीच वारी आम्हाला परत पाहायला मिळाली पाहिजे. 'हे विठ्ठला कोरोनाची संकट लवकरात लवकर दूर कर आणि आम्हाला पूर्वीप्रमाणे आषाढी वारी, वारकऱ्यांनी तुडुंब भरलेली पंढरी पाहू दे' असे साकडे पांडुरंग चरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले आहे.
विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्नीक मुख्यमंत्र्यांचा हस्ते-
सावळ्या विठ्ठलाची आज मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते आणि इंदुमती कोलते यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांचा समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेली केशव कोलते व इंदुमती कोलते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत कान्होपात्राचे वृक्षारोपण झाले. मंदिर समितीकडून तयार करण्यात आलेल्या प्रतिमेचा यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केशव कोलते व इंदुमती कोलते महापूजेचे मानाचे वारकरी -