सोलापूर- पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात 'कॅपेक्स' हा कृत्रिम पावसासाठी संशोधनपर प्रयोग केला जात आहे. २०१८ च्या वैज्ञानिक 'क्लाउड सीडिंग'च्या प्रयोगाचा हा दुसरा टप्पा आहे. यात २ विमानांचा वापर करून १२० दिवसांचा प्रयोग राबविण्यात येत आहे.
सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अशा परिस्थितीत कृत्रिम पावसाच्या संशोधन आणि प्रयोगासाठी फिरणारी विमाने लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मग शहर-जिल्ह्यात अधून-मधून पडणारा पाऊस हा नैसर्गिक आहे की कृत्रिम याविषयी अनेकांच्या मनात नानाविध प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण सपकाळ यांनी या प्रयोगाच्या प्रमुख तारा प्रभाकरन यांच्याशी संवाद साधला.