महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : विद्यार्थ्यांसह चित्रकारही रमले, आर्ट कॅम्प मधील चित्रांची होणार खरेदी

मुंबईतील नॅब आर्ट स्टुडिओ आणि जेएमडी ट्रस्टकडून सोलापुरातील सचिन खरात यांच्या स्टुडिओमध्ये चित्रकला कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून मुंबई-पुण्यासह सोलापुरातील अनेक चित्रकारांनी या कॅम्पमध्ये सहभाग नोंदविला आहे. यातील चित्रांची खरेदी नॅब आर्ट स्टुडिओ आणि जेएमडी ट्रस्टकडून खरेदी केली जाणार आहे.

चित्र काढण्यात रमलेले चित्रकार
चित्र काढण्यात रमलेले चित्रकार

By

Published : Feb 8, 2020, 10:26 AM IST

सोलापूर - नवोदित चित्रकार तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्राची खरेदी नॅब आर्ट स्टुडिओ आणि जेएमडी ट्रस्ट करणार आहे. विद्यार्थी तसेच नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सचिन खरात यांच्या स्टुडिओमध्ये भरलेल्या आर्ट कॅम्पमधील चित्रांची खरेदी केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांच्या सोलापुरातील कलादृष्टी या स्टुडिओमध्ये आर्ट कॅम्प सुरू आहे. मुंबईतील नॅब आर्ट स्टुडिओ आणि जेएमडी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सचिन खरात यांच्या स्टुडिओमध्ये आर्ट कॅम्प भरविण्यात आला आहे. 6 फेब्रुवारी रोजी सुरु झालेला हा कॅम्प 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांसह चित्रकार सहभागी झाले आहेत.

विद्यार्थ्यांसह चित्रकारही रमले

हेही वाचा - राज्यात 'मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करा ; ख्रिश्चन समाजाची मागणी

सोलापुरात कलेचे वातावरण तयार व्हावे तसेच चित्रकारांना देखील इतर मोठ्या चित्रकारांच्या स्टुडीओमध्ये जाऊन चित्र काढण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या आर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये मुंबई-पुण्यासह सोलापुरातील विद्यार्थी तसेच चित्रकारांनी सहभाग घेतला आहे. चित्र काढण्याबरोबरच चित्र कसे पाहावे तसेच रंगसंगती लँडस्केपिंग यासह चित्रकलेतील बारीकसारीक गोष्टींची माहिती ती व्यवस्थित चित्रकारांसह विद्यार्थ्यांनाही यामध्ये देण्यात येत आहे.

हेही वाचा - अत्याचारांच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद, सोलापुरात महिलांचा आक्रोश

या कॅम्पमध्ये सचिन खरात सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार काढून मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याची आनंदी प्रतिक्रिया त्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी तसेच नवोदित चित्रकार यांनी दिली आहे. त्यामध्ये सहभागी झालेले मुंबईतील काही चित्रकार हे हे व्यावसायिक चित्रकार असूनही त्यांनी सचिन खरात यांच्याकडून शिकण्यासाठी मिळत असल्यामुळे या कॅम्पमध्ये आवर्जून उपस्थिती लावली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - 'सुशील करंडक 2020' स्पर्धेचे अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उदघाटन

ABOUT THE AUTHOR

...view details