महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dnyaneshwar Mauli Palkhi : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन - Collector Milind Sundarkar

आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले.

Dnyaneshwar Mauli Palkhi
Dnyaneshwar Mauli Palkhi

By

Published : Jun 23, 2023, 5:23 PM IST

सोलापूर :धर्मापुरी येथे पालखीचे स्वागत केल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलींच्या रथाचे प्रस्थान केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद सुंदरकर उपस्थित होते. पालखीचे स्वागत केल्यानंतर प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधींनी पालखी सोहळ्यासह 20 व्या स्थानापर्यंत पायी चालत हरिनामाचा गजर करत आनंद लुटला. माऊलींच्या पालखीचे सकाळी 10.40 वाजता सोलापूर जिल्ह्यातील धर्मापुरी बंगल्यावर आगमन झाले. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माऊलींच्या पालखीला निरोप दिला.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज :पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकांना आवश्यक सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. पालखी मार्गावर शुद्ध पिण्याचे पाणी, पुरेशी स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारीमध्ये वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. धर्मापुरी येथे पालखीचे आगमन होण्यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले जात आहेत.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण :यामध्ये आरोग्य शिक्षण, लेक लाडकी, पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्ती, स्वच्छ्ता या विषयांचा प्रामुख्याने समावेश होता. धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाने वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड, स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने उभारलेल्या तात्पुरत्या अतिदक्षता कक्षास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता, पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक, ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन :धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू रजणीश कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

हेही वाचा -Insurance Cover To Warkari : वारकऱ्यांसाठी खुशखबर! वारीदरम्यान मिळणार आता विम्याचे कवच, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details