महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एक हजार वर्षाचा इतिहास असलेले प्राचीन काळातील अर्धनारीनटेश्वर मंदिर - पंंढरपूर ताज्या बातम्या

श्रावण महिन्यात राज्यातील भाविकांची अर्धनारीनटेश्वर महादेवाच्या मंदिरात मोठी गर्दी करतात. महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक वेळापुरात श्रावण महिन्यात दाखल होत असतात.

अर्धनारीनटेश्वर मंदिर
अर्धनारीनटेश्वर मंदिर

By

Published : Sep 6, 2021, 1:54 AM IST

पंढरपूर -पुणे-पंढरपूर या महामार्गावरील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील हरनारेश्वर महादेव मंदिर हे अर्धनारीनटेश्वरचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. अर्धनारीनटेश्वर महादेवाच्या मंदिराला एक हजार वर्षाचे हेमाडपंथी शिला वस्तू पद्धतीचे बांधकाम आहे. श्रावण महिन्यात राज्यातील भाविकांची अर्धनारीनटेश्वर महादेवाच्या मंदिरात मोठी गर्दी करतात. महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक वेळापुरात श्रावण महिन्यात दाखल होत असतात. कोरोना पार्श्वभूमीवर अर्धनारीनटेश्वर महादेवाचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहितीही महादेव मंदिराचे पुजारी अनंता गुरव यांनी दिली आहे.

अर्धनारीनटेश्वर मंदिर

दोन नंदी असलेले एकमेव मंदिर -

देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले. मात्र, काळानुसार वेळापूरचे स्थान बदलत गेले. त्यातही नव्याने भर पडत गेली इ.स. 1300 शतकापासून. वेळापूर प्रामुख्याने देवगिरीची दक्षिण सीमा म्हणून ओळखले जात होते. वेळापूर हे नाव यादवांच्या काळातच मिळाल्याचेही सांगण्यात येते. वेळापूर येथे धार्मिक स्थानाबरोबर यादवांचे लष्करी ठाणेही येथे तैनात होते. त्यामुळे वेळापूरला एक नवीन ओळख प्राप्त झाली. त्याकाळात अर्धनारी नटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यासंदर्भातील शिलालेखही मंदिरात आजही आढळून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य गाभारा, गाभार्‍यात पिंड व आतील नंदी तोही उघड्यावरच असावा असे त्यानंतर सर्व बाजूनी जीर्णोद्धार झाल्यावर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापणा केलीअसावी. राज्यात इतर महादेव मंदिरात दोन मंदिर कोठेही आढळून येत नाहीत.

अर्धनारीनटेश्वर मंदिर

हेमाडपंथी वस्तू पद्धतीचा उत्तम नमुना -

हेमाडपंथी वस्तू पद्धतीचे बांधकाम यादवांचा राजा रामचंद्र यांने 1271 ते 1310 या कालावधीमध्ये शिलालेख या देवळाच्या भिंतीवर कोरली आहेत. यामध्ये मराठी व संस्कृती भाषेत असणाऱ्या शिलालेखाचा संदर्भ आढळून येतो त्याचबरोबर अर्धनारीनटेश्वर मंदिरात मल्लसेठीचे स्मारक, अंबाबाईचे मंदिर, कांचन महाल, नाथ मंदिर, खंडोबा मंदिर, काळा मारुती यांचे प्राचीन मंदिरे आहेत. तसेच मंदिराभोवती उंच जाळी, संरक्षण भिंत, जमिनीवर दगडी फरशी बसून मंदिराची शोभा वाढविण्याचे काम केले आहे. मांदिराच्या गाभार्‍याच्या दरवाजावर गणपती कोरलेला दिसून येतो. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर भंग पावलेल्या अवस्थेत आढळून येते. मंदिरात वेगवेगळ्या प्रकाराच्या व आकाराच्या अनेक पिंडी आहेत. मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तत्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणून पाहावयास मिळतो.

अर्धनारीनटेश्वर

चैत्र पौर्णिमेस अर्धनारीनटेश्वर ग्राम देवाची यात्रा -

श्री अर्धनारीनटेश्वर ग्राम देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेस होत असते. शुद्ध पंचमीस हळदी, अष्टमीस लग्न, पौर्णिमेस वरात आणि वद्य अष्टमीस सोहळा, असा महोत्सव दरवर्षी साजरा केला जात असतो. या कालावधीत गावांमध्ये विविध स्पर्धेचे आयोजनही करण्यात येते. या मंदिरात यादव काळातील परंपरेला फार महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिन्याच्या सुरूवातीपासूनच भाविकांची महादेवाच्या मंदिरामध्ये मोठी रेलचेल असते. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक वेळापुरात येत असतात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर हे बंद ठेवण्यात आले आहे.

अर्धनारीनटेश्वर

हेही वाचा -राजू शेट्टींनी जलसमाधी घेऊ नये, त्यांची आम्हाला गरज आहे - जलसंपदामंत्री जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details