महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात 'मिशन संजीवनी'साठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन - सोलापूर महानगरपालिका

सोलापुरातील अनेक नागरिक वापरात न येणारी औषधे घंटा गाडीत किंवा कचरा कुंडीत फेकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. फेकून देण्यात आलेली औषधे ही चालू तारखेची देखील असतात. ही औषधे एखाद्या गरीब रुग्णाच्या वापरात येऊ शकतात, असा विचार आयुक्तांनी मांडला आहे. त्याचबरोबर सोलापूर महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर नागरिक दररोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.

सोलापूर महानगर
सोलापूर महानगर

By

Published : May 24, 2021, 3:53 AM IST

Updated : May 24, 2021, 4:11 AM IST

सोलापूर -सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून 'मिशन संजीवनी' ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. मिशन संजीवनी अंतर्गत सोलापुरातील नागरिकांना पालिकेने आवाहन केले आहे की, वापरात न आलेली औषधे सोलापूर पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांना दान द्या. शहरातील अनेक नागरिक वापरात न येणारी औषधे कचऱ्यात फेकल्याचे दिसून येत आहे. ही औषधे इतर गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी येतील असे आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिशन संजीवनी राबविण्यात येणार आहे. सोमवारी (आज) या मिशनचे नागरी आरोग्य केंद्रावर उद्घाटन केले जाणार आहे.

सोलापुरात मिशन संजीवनी

..म्हणून मिशन संजीवनी

सोलापुरातील अनेक नागरिक वापरात न येणारी औषधे घंटा गाडीत किंवा कचरा कुंडीत फेकून देत असल्याचे निदर्शनास आले आहे. फेकून देण्यात आलेली औषधे ही चालू तारखेची देखील असतात. ही औषधे एखाद्या गरीब रुग्णाच्या वापरात येऊ शकतात, असा विचार आयुक्तांनी मांडला आहे. त्याचबरोबर सोलापूर महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर नागरिक दररोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या, औषध हे उपचार सुरु असे पर्यत घेतात. उपचार संपल्यानंतर आपल्या जवळील गोळ्या, औषध हे तसेच पडून राहतात व नंतर ते कचराकुंडीत फेकून देत आहेत.


नागरी आरोग्य केंद्रात औषधींसाठी डबा ठेवला जाणार

फेकून देण्यात येत असलेल्या गोळ्या आणि औषध सामान्य नागरिकांसाठी व गोरगरिबांना उपयोगात येऊ शकतात. वापरलेले गोळ्या, औषधे, सिरप यांची योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, न वापरत असलेल्या गोळ्या, औषध ,सिरप हे उपयोगात येत नसतील आणि एक्सपायरी तारीख संपलेली नसेल. ही औषधे मिशन संजीवनी म्हणून शहरातील सर्व नागरिक आरोग्य केंद्रावर एक पोस्ट ऑफिस सारखा एक डबा ठेवण्यात आला आहे. त्याच्यामध्ये नागरिकांनी आपल्याकडील औषधे जमा करावी. ही सर्व औषधे दर आठवड्याला आरोग्यधिकारी व त्याठिकाणीचे फार्मासिस्ट यांच्या माध्यमातून ते वेगळे करण्यात येईल. तसेच त्यातील जे औषध चांगले आहेत. ते सामान्य नागरिकांसाठी पुन्हा वापरण्यात येईल.

Last Updated : May 24, 2021, 4:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details