सोलापूर- आषाढी वारीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी आपली गाणसेवा अर्पण केली. यावेळी त्यांनी देव माझा विठू सावळा हे भक्तिगीत सादर केले.
आपल्या भाव आणि भक्ती गीतांमधून मराठी मनावर अनुराधा पौडवाल यांनी अधिराज्य गाजवले. त्यात मोठा वाटा पंढरी आणि पांडुरंगाच्या गीतांचा समावेश आहे. त्यामुळे त्या दरवर्षी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या मंदिरात आपली सेवा बजावत आहेत.