सोलापूर - नवीन वीजजोडणीचा अहवाल व आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी 20 हजार रुपयांची शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यास अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. ही घटना नरखेड येथे घडली. प्रशांत प्रकाश कुंभार (53,नरखेड, ता मोहोळ) असे सहायक अभियंत्यांचे नाव आहे.
शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यास रंगेहात पकडले - सोलापूर न्यूज
नवीन वीज जोडणीचा अहवाल व आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी 20 हजार रुपयांची शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यास अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे.

नरखेड येथील शेतकऱ्यांला नवीन वीज कनेक्शन पाहिजे होते. त्यासाठी त्याने वीज कार्यालयात तसा अर्ज देखील केला होता. परंतु, वीज जोडणीचा अहवाल व आराखडा तयार करून तो वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी महावितरणच्या अभियंत्यांने 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीमध्ये 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी सुरुवातीला 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
नरखेड येथील शेतकऱ्याने सोलापूर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क करून याबद्दल तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या विभागाने शुक्रवारी मोहोळ येथील नरखेड वीज कार्यालायात सापळा लावला होता. 20 हजार रुपये घेताना त्या अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात यश आले. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई अँटी करप्शनचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, चंद्रकांत पवार, पद्मानंद चांगरपल्लू, प्रफुल्ल जानराव यांनी केली आहे.