महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात मानधन वाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मानधन वाढ निर्णयाची अंमलबजावणी शासनामार्फत होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By

Published : Jun 4, 2019, 4:24 PM IST

सोलापूर- मानधन वाढ निर्णयाची अंमलबजावणी शासनामार्फत होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन संदर्भातील निर्णय लवकर घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.

सूर्यवंशी गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

२० सप्टेंबर २०१८ रोजी शासनाकडून मानधनवाढीची अधिसूचना काढण्यात आली होती. केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात बाराशे पन्नास रुपये वाढ केली होती. तर, मदतनीसांच्या मानधनात ७५० रुपये दरमहा वाढ करण्याचे आदेश दिले होते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. मानधन वाढीच्या मागणीसाठी संघटनेतर्फे दोनदा मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तरीही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नासंदर्भात शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देऊनही प्रत्यक्षात ठोस कृती होत नसल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास शहरातील चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत अंतर्गत राज्यात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचार्‍यांवर शासन व प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सूर्यवंशी गायकवाड यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details