महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 24, 2021, 7:09 AM IST

ETV Bharat / state

Space travel : अवकाश सफरीसाठी सोलापुरातील आनंद बनसोडेंचा अमेरिकन कंपनीसोबत करार

आनंद बनसोडे यांचा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. वडील सायकलचे पंचर आणि आऊट काढण्याचा व्यवसाय करत होते. पण त्यांनी आपल्या गरीबीला अडचण होऊ दिले नाही. आर्थिक अडचणीचा सामना करत त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टसर केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आनंद बनसोडेनी आपले नाव लौकिक केले असून कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील पाठिंबा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

आनंद बनसोडे
आनंद बनसोडे

सोलापूर- 360 एक्सप्लोरर (360 Explorer) मार्फत जगभरात साहसी मोहिमा आखणाऱ्या आनंद बनसोडेने (Anand Bansode) 360 एक्सप्लोररची स्पेस टुरिजम युनिट (Space Tourism Unit) असलेल्या 360 स्पेस-ए सोबत अमेरिकेतील स्पेस परफेक्टीव्ह कंपनीचा (Space Perfect Company) करार झाला असून आता आनंद बनसोडे यांची कंपनी भारतात आणि भारताबाहेरही स्पेस टूर सुरू करू शकणार आहे. अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथील या कंपनीने सोलापूरच्या आनंद बनसोडे यांना ऑफिशियल स्पेस एक्सप्लोरेशन अडवायजर (Official Space Exploration Advisor) असा दर्जा दिला आहे. या कंपनीद्वारे सर्वात कमी खर्चात स्पेस टुरिजमची सुरुवात करून एक प्रकारची क्रांती केली आहे.

अवकाश सफरीसाठी सोलापुरातील आनंद बनसोडेंचा अमेरिकन कंपनीसोबत करार

स्पेस बलूनद्वारे अवकाशात मानव पाठवणार-

जगातील पाहिली लक्झरी स्पेस फ्लाईट असलेल्या स्पेस परफेक्टीव्ह कंपनीच्या अनेक वर्षाच्या संशोधनानंतर स्पेस बलूनद्वारे (Space balloon) अवकाशात मानव पाठविण्यात येणार आहे. रॉकेट शिवाय अवकाशात 1 लाख फूट उंचीवर स्पेस बलून पाठवून जून 2021 मध्ये या कंपनीने टेस्ट फ्लाईट केली होती.2024 मध्ये प्रत्यक्ष माणसांना याद्वारे अवकाशात पाठविण्यात येणार आहे.

सव्वा लाख डॉलरमध्येही स्पेस यात्रा होणार -

ही स्पेस यात्रा सव्वा लाख डॉलर मध्ये होणार आहे. भारतीय चलनात जवळपास 94 लाख रुपये खर्च येणार आहे. आता पर्यंतच्या सर्वात कमी बजेटमध्ये ही कंपनी स्पेस टुरिजम क्षेत्रात क्रांती करणार आहे. जगातील प्रसिद्ध असे ट्रेनर व कोच म्हणून ओळख असलेल्या अंथॉनी (टॉनि) रॉबिन्स (Anthony (Tony) Robbins) हे देखील या कंपनीचे गुंतवणूकदार आहेत. जगभरातील मोठमोठ्या उद्योजकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.

स्पेस बलून काय आहे-

स्पेस बलून ही प्रेशरराईज्ड कॅप्सूल आहे. काही किलोमीटरवर अवकाशात नेली जाणार आहे. तिथून सर्व स्पेस टुरिस्ट अवकाशाचा आनंद घेतील. स्पेस बलून खाली आणताना समुद्रात लँड केली जाणार आहे. बोटीच्या साहाय्याने सर्व स्पेस टुरिस्ट बाहेर येतील. या स्पेस टूर साठी कोणत्याही प्रकारची शारीरिक फिटनेसची आवश्यकतेची गरज नसल्याची माहिती आनंद बनसोडे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली.

अत्यंत गरीब कुटुंबातील सोलापूरच्या आनंदची उत्तुंग भरारी-

आनंद बनसोडे यांचा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. वडील सायकलचे पंचर आणि आऊट काढण्याचा व्यवसाय करत होते. पण त्यांनी आपल्या गरीबीला अडचण होऊ दिले नाही. आर्थिक अडचणीचा सामना करत त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट (The summit of Mount Everest)सर केला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आनंद बनसोडेनी आपले नाव लौकिक केले असून कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील पाठिंबा दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details