महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूरात एसटी बसच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार - राज्य परिवहन मंडळ

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे एका दुचाकीस्वारास राज्य परिवहन मंडळाच्या बसने मागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

अपघात
अपघात

By

Published : Jan 5, 2021, 10:44 PM IST

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे एका दुचाकीस्वरास राज्य परिवहन मंडळाच्या बसने मागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर चालकाने एसटी बस तिथून निघून गेला आहे.

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू-

पुणे -पंढरपूर मार्गावर वाखरी या गावात सकाळी आठच्या सुमारास कामावर निघालेल्या दुचाकीस्वार राजू माने (वय 52 रा. वाखरी ता. पंढरपूर) हे पोरे यांच्या घराजवळ आले असता. पंढरपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसने मागून धडक दिल्यामुळे राजू माने हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

राजू माने यांना धडक दिल्यानंतर एसटीच्या चालकाने बस न थांबता, पुण्याच्या दिशेने निघून गेला. मात्र प्रत्यक्षदर्शी उभे असणारे नागरिकांनी एसटी बसचा क्रमांक घेतला असून. तो नंबर तालुका पोलीस ठाण्यात कळवण्यात आला.

हेही वाचा-मालेगाव स्फोट प्रकरण : खासदार प्रज्ञा ठाकूर यांना न्यायालयात हजर राहण्यास सूट

ABOUT THE AUTHOR

...view details