महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambedkar jayanti 2022 - ..तोपर्यंत पाणी पिणार नाही.. दलित बांधवांच्या या भूमिकेने ती विहीर झाली ऐतिहासिक, वाचा.. - वळसंग विहीर बाबासाहेब आंबेडकर संबंध

आपल्या हयातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर दौरा केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ( Ambedkar jayanti 2022 ) उद्घाटन केलेली सार्वजनिक विहीर ( Walsang well Inauguration Dr Babasaheb Ambedkar ) आणि परिसर आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापुराशी असलेल्या संबंधांची साक्ष देत आहे.

Walsang well Inauguration Dr Babasaheb Ambedkar
वळसंग विहीर बाबासाहेब आंबेडकर संबंध

By

Published : Apr 13, 2022, 8:17 AM IST

सोलापूर -मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यांबरोबर बाबासाहेबांचा ( Ambedkar jayanti 2022 ) संपर्क सोलापूर या जिल्ह्यासोबत देखील होता. आपल्या हयातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ( Walsang well Inauguration Dr Babasaheb Ambedkar ) सोलापूर दौरा केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उद्घाटन केलेली सार्वजनिक विहीर आणि परिसर आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापुराशी असलेल्या संबंधांची साक्ष देत आहे.

माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ

हेही वाचा -आज तुमची वेळ, उद्या आमचीही वेळ येईल, छगन भुजबळांचा विरोधकांना इशारा

1920, 1927, 1935, 1937, 1942, 1946 या वर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात येऊन गेल्याचे संदर्भ किंवा पुरावे आढळतात. स्वातंत्र्याअगोदर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावातील दलितांना पाणी पिण्यासाठी अनेक निर्बंध होती. अखेर दलितांनी 1937 रोजी स्वतःची विहीर खोदून तयार केली. मात्र, याचे पाणी अगोदर डॉ. बाबासाहेबांनी प्यावे आणि मग दलितांसाठी खुली करण्यात यावी, असा आग्रह येथील दलितांनी केला होता. 24 एप्रिल 1937 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः सोलापुरातील वळसंग ( Walsang well Inauguration ) येथील गावात आले. आणि या विहिरीचे पाणी त्यांनी प्रथम प्राशन केले आणि मग ती विहीर दलितांसाठी आणि इतर नागरिकांसाठी सार्वजनिक रित्या खुली करण्यात आली.

विहिरीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर - दरवर्षी वळसंग येथील दलित बांधव 14 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. आणि विहिरीचे सुशोभीकरण करतात. यंदा शासनाने या विहिरीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विहिरीवर स्तूप बांधले जाणार असल्याची माहिती वळसंग येथील दलित बांधवानी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे 1937 पूर्वी दलित बांधवानी स्वतःच्या वस्तीसाठी सार्वजनिक विहीर श्रमदान आणि लोक वर्गणीतून बांधली होती. त्याच सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे, जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वळसंग येथे येऊन या विहिरीचे पाणी पिऊन उद्घाटन करत नाहीत, तोपर्यंत कोणीही पाणी पिणार नाही, अशी भूमिका दलित बांधवानी घेतली होती. अखेर तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते भुजंगप्पा रुई, तेजप्पा वाघमारे, ओंकारी गायकवाड, विजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून 24 एप्रिल 1937 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वळसंग येथे आले. स्वातंत्र्य सैनिक गुरुसिद्धप्पा अंटद यांनी स्वतःची बैलगाडी बाबासाहेबांसाठी उपलब्ध करून दिली आणि भव्य मिरवणुकीत आंबेडकर वळसंग येथे आले. मिरवणुकीनंतर बाबासाहेब यांनी रेशमी दोरीने पाणी शेंदून चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्राशन केले.

वळसंग येथील विहीर बाबासाहेबांची साक्ष देते -वळसंग येथील विहिरीचेडॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन 85 वर्षे झाली आहेत. ती आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष देत आहे. आजही जवळपास दोन हजार दलित बांधव आणि गावातील इतर नागरिक या विहिरीच पाणी पितात. दरवर्षी या विहिरीभोवती दलित बांधव भीम जयंती किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. 14 एप्रिल ते 24 एप्रिल असे दहा दिवस भीम जयंतीचा मोठा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हेही वाचा -Solapur Ram Navami : सोलापुरात राम नवमीनिमित्त शिवसेनेची भव्य शोभायात्रा.. मुस्लिम, दलित बांधवांचाही सहभाग

ABOUT THE AUTHOR

...view details