सोलापूर -ऐन कडक उन्हाळ्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ.व्यंकटेश मेतन यांनी सोलापुरकरांना अमेरिकन अमेझॉन खोऱ्याची जंगल सफारी घडवली. या सफरीनंतर रखरखत्या उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना जगातील 50 टक्के रेन फॉरेस्ट असलेल्या अमेझॉन खोऱ्याची जणू भुरळच पडली आहे.
सोलापुरकरांनी केली अमेझॉन खोऱ्यातील रेन फॉरेस्टची सफर - trivago
स्थानिक समाजसेवी संस्थांनी निसर्गवर्णनपर स्लाईड शोचे आयोजन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी आणि हौशी फोटोग्राफरनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.
स्थानिक समाजसेवी संस्थांनी निसर्गवर्णनपर स्लाईड शोचे आयोजन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी आणि हौशी फोटोग्राफरनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. निसर्ग प्रवास वर्णन आणि फोटोग्राफीवर आधारित कार्यक्रम उपस्थितांना अमेझॉन खोऱ्यातील निसर्गसंपदा, जैवसृष्टी आणि लोकजीवनाची पर्वणी ठरली.
सिमेंटच्या जंगलात आयुष्य जगणाऱ्या समाज घटकांना निसर्गाशी जोडण्यासाठी हा उपक्रम होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. ध्वनिप्रदूषण कमी करा, पाणी आणि वृक्षसंवर्धन करा अशा गोष्टीचे समाज प्रबोधन करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी असल्याची प्रतिक्रिया सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. त्यावरून समाजमन निसर्गप्रति सजग करण्याच्या या उपक्रमाला व्यापक स्वरूप यायला हवे असेच म्हणावे लागेल.