VIDEO : संत तुकाराम, संत निवृत्तीनाथांसह सर्व मानाच्या पालख्या वाखरी नगरीत दाखल - all warkari Reached at wakhari
संत निवृत्तीनाथ महाराज, संत चांगटेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काकांच्या पालख्यांसह सर्व मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या आहेत.
पंढरपूर (वाखरी) -संत निवृत्तीनाथ महाराज, संत चांगटेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काकांच्या पालख्यांसह सर्व मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर दाखल झाल्या आहेत. यावेळी संत तुकाराम पालखीचे वाखरी विठ्ठल मंदिर समितीकडून स्वागत करण्यात आले. वाखरी पालखी तळापासून थोड्याच वेळात पायी दिंडीला सुरुवात होणार आहे. वाखरी पालखीतळ ते विसावा मंदिर अशी पायी दिंडी असेल. या पालखी सोहळ्यामध्ये 400 वारकरी सहभागी होईल. त्यामुळे टाळ-मृदुंगाचा आवाज सुमारे दीड वर्षानंतर पंढरीत घुमणार आहे. तर विसावा मंदिर ते पंढरपूर या दरम्यान दोन वारकऱ्यांना पायी पंढरीत चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.