सोलापूर- शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीमा सील (बंद) करण्यात आल्या आहेत. सर्व सीमांवर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. बाहेरून शहरात येण्यासाठी एकूण 10 रस्ते आहेत. या दहाही रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरुन विनाकारण कोणालाही शहरात येऊ दिले जात नाही.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. देशात आणि राज्यात टाळेबंदी झाली आहे. लॉकडाऊनचा निर्णय होण्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी केलेल्या नियोजनामुळे शहर व जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या आटोक्यात राहिली. योग्य नियोजनामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर देखील मोठया प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.