महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पंढरपुरात येण्यासाठी दिलेले राज्यातील सर्व पास रद्द'

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सामाजिक अंतर ठेवण्याच्या उद्दीष्ठाने विविध पालक्यांसह काही लोकांनाच परवानगी मिळाली आहे. तसेच विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरसाठी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

बैठकीतील छायाचित्र
बैठकीतील छायाचित्र

By

Published : Jun 28, 2020, 1:04 PM IST

सोलापूर- आषाढी एकादशीला पंढरपुरात येण्यासाठी देण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत. परवाना दाखवून पंढरपूर शहरात कोणी येण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यांना पंढरपूर शहरात येऊ दिले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांसह आदी उपस्थित होते.

या बैठकीत गृहमंत्री देशमुख यांनी पंढरपूर आषाढी एकादशी बंदोबस्त आढावा घेतला. या बैठकीत एक माहिती समोर आली. त्यामध्ये राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील लोकांना पंढरपुरात येण्यासाठी परवाने दिले आहेत. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी वाटप केलेल्या परवान्यामुळे पंढरपूर शहरात गर्दी होऊ शकते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातील वाटप करण्यात आलेले परवाने रद्द करण्याची गरज असल्याचे पोलीस प्रशासनाने या बैठकीत सांगितले.

हेही वाचा -आषाढी एकादशी तीन दिवसांवर असताना पंढरपूरमध्ये कोरोना रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details