सोलापूर -इंदापूर(पुणे) तालुक्यातील लाकडी-निंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाणी देण्यास राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही योजना जुनीच आहे, त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी सोलापूरकराना विनंती केली होती. राज्यपातळीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बाजू घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी उचलून धरला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापुरातून कडाडून विरोध केला जात आहे. ( All party Worship against Ajit Pawar and Dattatray Bharane )
सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात महाआरतीने आंदोलनाची सुरुवात -अतुल खूपसे यांच्या नेतृत्वाखाली उजनीच्या पाण्यासाठी सोलापुरात सर्वपक्षीय नेते एकत्र झाले आहेत. त्यांनी मोहोळमध्ये बैठक घेऊन आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना सद्बुद्धी दे असे साकडे सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी घालण्यात आले.