सोलापूर- अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. किसान सभेचे नेते सिद्धपा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सोलापुरात किसान सभा रस्त्यावर - जिल्हाधिकारी कार्यालय
केंद्र आणि राज्यातल्या भाजपच्या सरकारांनी सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमी भाव अशा सर्वच विषयात बळीराजाची फसवणूक केली. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज सोलापुरात डाव्या आघाडीच्या अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
केंद्र आणि राज्यातल्या भाजपच्या सरकारांनी सरसकट कर्जमाफी, पीक विमा, हमी भाव अशा सर्वच विषयात बळीराजाची फसवणूक केली. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून सोलापुरात डाव्या आघाडीच्या अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी भांडवलदार, भाजप सरकार आणि त्यांची शोषित धोरणे यावर सडकून टीका केली.
आपल्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांनाही सरकार जुमानत नाही. तर नाशिकहून मुंबईला नेण्यात आलेल्या आंदोलनावेळी खोटी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.