सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील या भाजप नेत्यांच्या कार्याचे कौतुक केले. उद्या १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये करणार प्रवेश - रणजितसिंह मोहिते-पाटील - रणजितसिंह मोहिते-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील या भाजप नेत्यांच्या कार्याचे कौतुक केले. उद्या १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी अकलूज येथील मोहिते-पाटलांच्या शिवरत्न या बंगल्यावर मेळावा आयोजित केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते-पाटील पिता-पुत्रांना डावलण्यात येत असून राष्ट्रवादीकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा उभारण्याची हीच योग्य वेळ आहे अशी भावना मोहिते-पाटील समर्थकांमध्ये झालेली होती. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची, अशी भूमिका घेतलेल्या कार्यकर्त्यांनी आज शिवरत्न बंगल्यावर मेळावा घेतला.
दुपारी अडीच वाजता सुरू झालेल्या या मेळाव्यामध्ये मोहिते-पाटलांचे समर्थक-कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून म्हाडा लोकसभा मतदारसंघातून उभे रहावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी केल्यामुळे, उद्या दुपारपर्यंत रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मुंबईत भाजप प्रवेश होणार आहे.