पंढरपूर (सोलापूर) -मराठा समाजाच्या ( Maratha Reservation ) विविध मागण्यांसाठी मुंबई येथे ( Aazad Maidan Mumbai ) खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने 28 फेब्रुवारी रोजी 'पंढरपूर बंद'ची ( Pandharpur Bandh ) हाक दिली आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
'सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूर बंद' -
राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील मैदानावर संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा संघाच्यावतीने सोमवारी पंढरपूर पूर्ण बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण व विविध मागण्या संदर्भात अनेक मराठी युवकांनी बलिदान दिले आहे. मात्र, तरीही राज्यातील कोणत्या राज्य सरकारने मराठ्याच्या समाजाच्या मागण्या मान्य केले नाही. राज्य सरकारने देऊ केलेल्या उपाययोजनांचा मराठा समाजाला कोणताही लाभ मिळाला नाही. या सरकारने फसवणूक केली आहे. यासंदर्भात सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अर्जुन चव्हाण यांनी दिली आहे.