पंढरपूर (सोलापूर)- महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडे तीस आमदारांची कमतरता आहे. भारतीय जनता पक्षांकडून त्यांचे 105 आमदार दुसरीकडे जाऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाषा केली जात आहे. त्यांच्या आमदारांना गाजर दाखवण्याचे काम भाजप नेते करत असलेल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरातील शिवाजी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जंगी सभा घेण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंपा म्हणत उडवली चंद्रकांत पाटील यांची खिल्ली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणत त्यांच्या नावाची पुन्हा एकदा खिल्ली उडवली. भाजपच्या कोणत्याच नेत्यांनी सहकारी संस्था काढल्या नाहीत किंवा कारखानेही उभारले नाही. भाजप नेत्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही. पुढे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यावर निशाणा साधत पवार म्हणाले, भाजपने कधी टरबूज-खरबूज संस्थाही काढली नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.