महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur News : लवकरच सोलापुरात विमानसेवा सुरू होणार, विकास मंचचा प्रयत्न

सोलापुरातील कळीचा मुद्दा ठरलेली श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी महानगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार पडण्यात आली. आता लवकरच सोलापूर ते हैदराबाद आणि सोलापूर ते बंगळुरू अशी विमानसेवा पुढील तीन महिन्यांत सुरू होईल अशी माहिती विकास मंचच्या केतन शहा यांनी दिली.

Solapur News
सोलापुरात विमानसेवा सुरू होणार

By

Published : Jun 16, 2023, 10:25 PM IST

माहिती देताना शहा

सोलापूर: सोलापुरातील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवेचा अडथळा दूर केला आहे. सोलापुरात दररोज विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूर विचार मंचने आठ वर्षे पाठपुरावा केला होता. या लढ्याला यश आले असून, साखर कारखान्याची चिमणी इतिहासजमा झाली आहे. जवळपास अडीच कोटी रुपये खर्च चिमणी पाडकामाला झाला असून हा खर्च प्रशासन श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याकडून वसूल करणार आहे.

आमदार खासदारांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं: सोलापूरचा विकास व्हावा यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर विकास करण्याची जबाबदारी असते. लोकप्रतिनिधीनी पाठ दाखवल्याने सोलापूर विकास मंचने पाठपुरावा केला. केतन शहा यांनी बोलताना सांगितले की, सोलापूर मधील अनेक इंडस्ट्रीज, उद्योग, उच्च शिक्षित तरुण हे सोलापूर सोडून इतर जिल्ह्यात रोजगारासाठी जात होते. सोलापूर मधील लोकप्रतिनिधींनी अनेकदा यावर राजकारण केले. मात्र सोलापूरच्या विकासासाठी काहीही केले नाही, अशी खंत शहा यांनी बोलून दाखवली. जे आमदार खासदारांना जमले नाही ते सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी करून दाखवले आहे.

लवकरच सोलापुरात विमानसेवा सुरू होईल : सोशल मीडियावर चिमणी पाडतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. चिमणी पाडली आता विमानसेवा कधी सुरू होणार असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत होते. याला सोलापूर विकास मंचने उत्तर दिले आहे. सोलापूर विकास मंच विमानसेवेसाठी शेवटपर्यंत लढाई लढणार आहे. डिजीसीए ऑथोरीटीशी चर्चा सुरू आहे. स्टार एअरलाईन्स आणि जेट स्पाईस या विमान कंपन्यांशी बोलणे सुरू आहे. लवकरच सोलापूर ते हैदराबाद आणि सोलापूर ते बंगळुरू अशी विमानसेवा पुढील तीन महिन्यांत सुरू होईल अशी माहिती केतन शहा यांनी दिली.

चिमणी अखेर पाडली: शहरातील नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडली. काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली होती. पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. तसेच कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.

हेही वाचा -

  1. Siddheshwar Sugar Factory अखेर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त महापालिकेची मोठी कारवाई
  2. Police Detain CPI Activist विमानतळाच्या मार्गात कारखान्याच्या चिमणीचा अडथळा पाडकामाला विरोध करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांची धरपकड
  3. Sri Siddheshwar Cooperative Sugar Factory सोलापुरातील त्या वादग्रस्त चिमणीचे पाडकाम सुरू श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कर्फ्यु

ABOUT THE AUTHOR

...view details