महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 9, 2020, 11:38 AM IST

ETV Bharat / state

सोलापुरात शहराध्यक्षपदावरून 'एमआयएम'मध्ये बंडाळी

नगरसेवक तौफिक शेख यांना एमआयएमच्या शहराक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी फारूक शाब्दी यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे तौफिक शेख यांच्या समर्थकांसह पक्षाच्या नगरसेवकांनी निवडीप्रसंगी गोंधळ घातला. पण, स्थानिक पातळीवरील हा विरोध झुगारून शाब्दी यांची शहराध्यक्षपदी निवड जाहीर केली. त्यामुळे नगरसेवकांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

सोलापूर - पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून एआयएमआयएम पक्षात अंतर्गत बंडाळी उफाळून आली. यानिमित्ताने सोलापूरच्या एआयएमआयएम पक्षात फारूक शाब्दी विरुध्द तौफिक शेख समर्थकांचा सामना पाहायला मिळाला. तौफिक शेख यांना शहाराध्यक्ष पदावरून हटविल्यास 9 नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे देण्याचा इशारा दिला.

सोलापुरात शहराध्यक्षपदावरून 'एमआयएम'मध्ये बंडाळी

एआयएमआयएम पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष नगरसेवक तौफिक शेख हे रेश्मा पडेकनूर खूनप्रकरणी सहा महिन्यांपासून कर्नाटक पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे पक्षातील एक गट हा एआयएमआयएम पक्षाच्या शहाराध्यक्षपदी नव्या नेत्याची निवड करण्याची मागणी करत होता. त्यामुळे पक्षाने शनिवारी ( दि. 9 फेब्रुवारी) सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात नव्या नेत्यांच्या निवडीची बैठक ठेवली होती. या बैठकीला पक्षाचे राज्यकार्याध्यक्ष गफ्फार कादरी आणि सोलापूर जिल्हा प्रभारी अन्वर सादात उपस्थित होते.

हेही वाचा - सोलापूर : विद्यार्थ्यांसह चित्रकारही रमले, आर्ट कॅम्प मधील चित्रांची होणार खरेदी

या बैठकीत शहराध्यक्षपदी अक्कलकोटचे रहिवासी आणि मुंबईतील व्यावसायिक फारूक शाब्दी यांची निवड करण्यात आली. त्याला तौफिक शेख समर्थकांनी जोरदार विरोध केला. बैठक सोडून सर्वजण माध्यमांसमोर येऊन आपली मागणी लावून धरली. यावेळी नगरसेविका शाजिया शेख, तस्लीम शेख, वाहिदा शेख, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, अमित अजनाळकर, इक्बाल शेख, अल्ताफ बेलीफ, जुबेर पटेल आणि प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा - सोलापुरात नेत्रशस्त्रक्रिया शिबिरातील रुग्णाचा मृत्यू, डॉ. तात्याराव लहाने करत होते शस्त्रक्रिया

2014 साली माजी शहराध्यक्ष तौफिक शेख उर्फ पैलवान तर 2019 ला नूतन शहाराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभा लढवली होती. या दोन्ही लढतीत एआयएमआयएम पक्ष दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून पराभूत झाला. त्यातच आता या पक्षांत उफाळलेली गटबाजी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात या वादाला अप्रत्यक्षपणे आणखी खत पाणी घातले जाईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी लावला आहे.

हेही वाचा - सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सोमनाथ गुळमीरे यांची निवड

ABOUT THE AUTHOR

...view details