सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी 856 ग्रामपंचायतींना कुलूप लावून त्यांच्या चाव्या आणि शिक्के तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करत कामबंद आंदोलन केले आहे. विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या काही वर्षांपासून मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यामुळेच या सरकारच्या काळात चौथ्यांचा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तसेच हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले आहे.
सोलापुरातील साडेआठशे ग्रामसेवकांचे बेमुदत कामबंद आंदोलन - संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ
गेल्या काही वर्षांपासून मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यामुळेच या सरकारच्या काळात चौथ्यांचा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तसेच हे आंदोलन ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे घेतले जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भुजबळ यांनी सांगितले आहे.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद तयार करावे. ग्रामसेवक संवर्गास शासन निणर्याप्रमाणे प्रवास भत्ता मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अहर्ता बदलून पदवीधर ग्रामसेवक देणे, सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्य व जिल्हा स्तरावरील आदर्श ग्रामसेवकांना एक जादा वेतनवाढ देणे, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत राज्यभर सज्जांची पुर्नरचना करणे आणि ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी यांची कार्यालये व पदवाढ करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या संघटनेच्यावतीने शासन दरबारी आंदोलने करीत आहेत. त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देण्यात येऊन सुध्दा शासनाने एकही मागणी निकाली काढलेली नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
यासाठी पुन्हा 22 ऑगस्ट पासून राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलना दरम्यान ग्रामसेवकांनी आपले सही शिक्के व कार्यालयाच्या चाव्या गट विकास अधिकार्यांकडे सुपूर्द केल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील सर्व 94 गावांमधील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या चाव्या गटविकास अधिकारी रविकरण घोडके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.